कारलं आणि दूध चुकूनही सोबत खाऊ नका. यामुळे पोट बिघडतं. तसेच पोटात बद्धकोष्टता, जळजळ आणि त्रास होऊ शकतो
दही आणि ताकात लॅक्टिक अॅसिड असल्यामुळे कारल्यातील पोषण तत्वांशी क्रिया होऊन शरीरावर त्वचेची समस्या निर्माण होऊन खाज सुटू शकते.
आंबा जितका गोड आणि चवदार आहे याच्या उलट कारलं अत्यंत कडू असतं. या दोघांतील गुणधर्मातील फरक लक्षात घेता दोघांना एकत्र खाऊ नये.
भेंडी आणि कारलं सोबत खाण्यामुळे पचनास समस्या निर्माण होऊ शकतं. त्यामुळे भेंडी आणि कारलं एकत्र खाणं टाळा.
तुम्ही कारलं आणि मुळा यांना सोबत खात असाल तर तुम्हाला आजारी पाडण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे पोटात जाऊन गडबड होऊ शकते.