अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) तिसऱ्यांदा अवकाशात झेपावणार आहेत.
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण अविस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सुनीता विल्यम्स अंतराळातील चाचणी मोहिमेवर नवं अंतराळयान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांनी 5 जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल येथून नासाचे अंतराळवीर बॅरी 'बुच' विल्मोर,
यांच्यासोबत बोइंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केलं.
दोन्ही अंतराळवीर सुमारे आठवडाभर अंतराळ स्थानकावर थांबतील.
बोईंग क्रू फ्लाईट टेस्ट (CFT) नावाचं मिशन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम म्हणून सुरू करण्यात आलं आहे.
सुनीता यांनी सर्वाधिक स्पेसवॉक (7) आणि स्पेसवॉक टाईम (50 तास, 40 मिनिटं) करण्याचा विक्रम केला आहे.