दुबईत मुसळधार पाऊस झाला असून सर्वत्र पाणीच पाणी भरलं आहे.
मुसळधार पावसामुळे दुबईत विजेचा कडकडाट पाहायला मिळाला.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 75 वर्षामध्ये सर्वात जास्त पाऊस पडला आहे
संयुक्त अरब अमिरातीमधील बदललेल्या हवामानामुळे लोकांची तारांबळ उडाली .
दुबईसह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं.
दुबईत एअरपोर्ट आणि मॉल पाण्याखाली गेले आहेत.
मुसळधार पावसामुळे प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दुबईतील अनेक भागात रेड अलर्ट जारी केला आहे.
सोमवारी रात्री उशिरा ते मंगळवार सकाळपर्यंत यूएईच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू होता.
मुसळधार पावसामुळे दुबईच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
इतकंच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे.