जगात पहिल्यांदाच वैद्यकीय विश्वातील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. त्याने वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. एका डॉक्टरला रुग्णामुळे कर्करोग झाल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे. एका डॉक्टरला ऑपरेशन दरम्यान कॅन्सर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशाप्रकारे एखाद्या डॉक्टरला कॅन्सरची बाधा झाल्याची घटना जगात पहिल्यांदाच घडली आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. जर्मनीमध्ये एका 53 वर्षीय सर्जनने 32 वर्षीय रुग्णाच्या पोटातून दुर्मिळ प्रकारचा कर्करोगाचा ट्यूमर काढण्यासाठी ऑपरेशन केले. डेली मेलमधील वृत्तानुसार, ऑपरेशनदरम्यान डॉक्टरचा हात कापला गेला होता. पण त्याची जखम लगेचच निर्जंतुकीकरण करुम मलमपट्टी करण्यात आली. मात्र, पाच महिन्यांनंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं की, हात कापलेल्या ठिकाणी एक लहान गाठ तयार झाली आहे. तपासाअंती ही गाठ कॅन्सरची असल्याचं लक्षात आले, रुग्णाच्या शरीरात असलेल्या कर्करोगाचाच तो प्रकार होता. तपासणीनंतर, तज्ज्ञांनी सांगितलं की, ही गाठ रुग्णाच्या कर्करोगाशी संबंधित ट्यूमर पेशींमुळे झाली आहे.