उत्तर कोरियाचा हुकुमशाह किंग जोग विचित्र नियम आणि फर्मान यांच्यासाठी ओळखला जातो. तो जनतेवर विचित्र नियम लादल्यामुळे नेहमीच चर्चेत असतो.
किम जोंग उनला खाद्यभ्रमंती करायला आवडते, वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखायला आवडतात.
किम जोंग-उनला लहानपणापासूनच स्विस चीज आवडतं. स्विस चीज त्याच्या सुगंध आणि चवसाठी ओळखलं जातं. त्यांच्यासाठी उत्तम दर्जाचे स्विस चीज उपलब्ध करून देण्यात येतं.
उत्तर कोरियाच्या मीडिया रिपोर्टनुसार, किम जोंगच्या नियमित फूड मेनूमध्ये ट्यूना फिशपासून बनवलेल्या सुशीचा समावेश आहे.
स्नेक वाइन आणि रशियन व्होडका व्यतिरिक्त, किम जोंगला विविध प्रकारचे शॅम्पेन पिणं आवडतं. यापैकी अनेक शॅम्पेन परदेशांतून आलेल्या असतात.
किम जोंग-उनला विशेषतः ब्राझीलची कॉफी आवडते. ही कॉफी खास किम जोंगसाठी ब्राझीलमधून उत्तर कोरिया आयात केली जाते.
किम जोंग उन कोब मीट (Cobe Beef) खाणं पसंत करतो, जे त्याच्यासाठी खास जपानमधून आयात केलं जातं. कोब मीट हे जगातील सर्वात महागडं मांस आहे.
याशिवाय त्याला डेन्मार्कचे उच्च दर्जाचे डुकराचं मांस आणि इराणमधील प्रसिद्ध कॅविअर खायलाही खूप आवडतं. कॅविअर म्हणजे माशाची अंडी.