हिवाळ्यातही उकळतं 'या' नदीचं पाणी, वैज्ञानिकांनाही सुटलं नाही कोडं

जगात अनेक अनोख्या आणि रहस्यमयी नद्या आहेत, त्यापैकी काही त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी तर काही त्यांच्या विचित्र वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात.

तुम्हाला माहित आहे का, की जगात एक अशी नदी आहे, जिथे पाणी नेहमी उकळत असते.

उकळती नदी म्हणून ओळखली जाणारी ही नदी सुमारे 7 किलोमीटर लांब आहे. या नदीला शास्त्रज्ञांनी थर्मल रिव्हर असंही नाव दिलं आहे.

ही नदी ॲमेझॉनच्या जंगलात आहे. या नदीच्या पाण्यात चुकून कोणी पडल्यास त्याचा मृत्यू जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जातं.

प्राचीन काळी, याला शनाय-टिंपिशका (Shanay-Timpishka) देखील म्हटलं जात असे. Shanay-Timpishka म्हणजे सूर्याच्या उष्णतेने उकळलेले पाणी.

थंडीच्या मोसमातही या नदीचं पाणी इतकं गरम असतं की, या गरम पाण्याची वाफ आजूबाजूला पसरताना स्पष्ट दिसते. याच पाण्याच्या वाफा पसरल्यामुळे काही वेळा या भागातील दृश्यमानता खूपच कमी होते.

या नदीचे पाणी 200 डिग्री फॅरेनहाइटवर उकळत राहते. या रहस्यमय नदीचा शोध भूगर्भशास्त्रज्ञ आंद्रे रुजो यांनी 2011 मध्ये लावला होता.

काही शास्त्रज्ञांच्या मते, या नदीपासून सुमारे 700 किलोमीटर अंतरावर असलेला ज्वालामुखी हे पाणी गरम होण्याचे मुख्य कारण आहे, पण काही लोक याला मुख्य कारण म्हणत नाहीत.

दरम्यान, या नदीचं पाणी उकळतं असण्यामागचं रहस्य अद्याप शास्त्रज्ञांनाही उलगडलेलं नाही. यासंदर्भात अजूनही संशोधन सुरु आहे.