भारताचा शेजारील देश बांगलादेश सध्या हिंसाचारानं होरपळलाय.



गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं.



गेल्या काही दिवसांत या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालंय



हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली



पण, बांगलादेश एवढं धुमसण्यामागे नेमकं कारण काय?



बांगलादेशातील हिंसा आणि विवादामागे आरक्षण हे एकमेव कारण आहे.



शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू आहे.



1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपलं योगदान दिलं.



लढ्यात ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्यांच्या वंशजांना मिळत असलेलं आरक्षण कायम राहावं, असं आंदोलकर्त्यांचं मत आहे.



तर हे आरक्षण आता बंद करावं, असं दुसऱ्या एका गटाचं मत आहे.



बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळतं.



बांगलादेशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिलं जातं. तर, एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिलं जातं.



सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत 300 जणांचा मृत्यू झालाय.