आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. 'पासर डोमेस्टीकस' अर्थातच 'हाऊस स्पॅरो' ही चिमण्यांची जात सर्व जगभरात आहे. जगभरात 26 जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. उन्हाचा दाह वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे. पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे.