उस्मानाबादमध्ये सायकलिस्टसाठी सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उस्मानाबाद आणि स्पोर्ट्स अकादमीने, फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्स सायक्लोथॉन 2022 आयोजन केलं. एबीपी माझा समूह सायक्लोथॉनसाठी मीडिया पार्टनर होता. उस्मानाबाद बरोबरच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, लातूर, अहमदनगर, सोलापूर, बार्शी शहरातील सायकलिस्ट या सायक्लोथॉनमध्ये सहभागी झाले. उस्मानाबादच्या या पहिल्या सायक्लोथॉनमध्ये 400 सायकलिस्ट सहभागी झाले पहाटे 5:30 वाजता वरुडा रोड ब्रीज या ठिकाणी पासून स्पर्धेला सुरूवात झाली. 25 किमी, 50 किमी व 100 किमी या तीन प्रकारात ही सायक्लोथॉन पार पडली. सायक्लोथॉनमध्ये सहभागी सर्व सायकलिस्टना हेल्मेट सक्तीचे आहे. हेल्मेट शिवाय सहभाग घेता येणार नाही.