थंडगार हवेच्या पाचगणी परिसरातील टेबल लॅन्डवर काल भयानक मोठे वावटळ उठले होते.

हे वावटळ आकाशाला भिडणारे होते.

यामुळं परिसरातील अनेक छोट्या छोट्या दुकानांचे नुकसान झालं.

वावटळ पाहून उपस्थित असलेले पर्यटक भयभीत झाले होते.

नुकसान झालं असलं तरी यात कुणालाही सुदैवानं इजा झाली नाही.

या वावटळीची चर्चा परिसरासह संपूर्ण जिल्हाभर होतेय



कुणीतरी याचे मोबाईलमध्ये शुटिंग केले. सोशल मिडियावर व्हायरल केले.

ही छायाचित्रं त्या व्हायरल व्हिडीओमधून घेतलेली आहेत.