मौनी रॉय लग्नानंतर सुंदर फोटोंमुळे पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. होळीची सुट्टी साजरी करण्यासाठी मौनी रॉय श्रीलंकेला गेली आहे. मौनी रॉयने मोठी टोपी घातलेला तिचा बिकिनीमध्ये फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मौनी रॉयचा नॉटेड बिकिनी परिधान केलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बॅलेट ऑफ द बॉल. मौनी रॉयने कोलंबोमधून होळीच्या दिवशी अनेक फोटो शेअर केले आहेत. मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्रामवर मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवताना अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तीने काही व्हिडीओही शेअर केले आहेत. यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. छोटे कपडे परिधान केल्याने तिची स्टाइल थोडी वेगळी दिसत आहे. चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.