आकाशात विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेष ही धूर असल्याचा अनेकांचा समज आहे.



पण हा मोठा गैरसमज आहे.



अमेरिकन अंतराळ संस्था नासा च्या रिपोर्टनुसार, विमानाच्या मागे दिसणारी पांढऱ्या रंगाच्या रेषांना कंट्रेल्स म्हणतात.



कंट्रेल्स म्हणजे एक प्रकारचे ढग असतात.



पण कंट्रेल्स सामान्य ढगांपेक्षा वेगळे असतात.



हे ढग फक्त विमान किंवा रॉकेटमुळेच तयार होतात.



जेव्हा विमान पृथ्वीपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि -40 डिग्री सेल्सिअस तापमानात उडत असते, तेव्हाच हे ढग (कंट्रेल्स) तयार होतात.



रॉकेट किंवा विमानांच्या एग्जॉस्टमधून एरोसॉल्स बाहेर पडतात.



एरोसॉल्स म्हणजे हवेतील द्रव बिंदू आणि इतर वायूचे सूक्ष्म कण.



हवामानातील आर्द्रतेमुळे या एरोसॉल्सचे रुपांतर ढगात होते, यालाच कंट्रेल्स म्हटलं जातं.