जगभरात दारु पिणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बाजारात देखील दारु बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या प्रत्येकाची चव आणि बनवण्याचा पद्धत ही वेगळी आहे. पंरतु दारु ही प्रामुख्याने काचेच्या बॉटलमध्येच येते. अनेक वर्षांपासून दारु ही काचेच्या बॉटलमध्येच विकली जाते. पण दारु ही प्रामुख्याने काचेच्या बॉटलमध्येच का विकली जाते? खरंतर काचेच्या बॉटलमध्ये दारुची गुणवत्ता चांगली ठेवण्यास मदत होते. काचेच्या बॉटलमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया होत नाही. त्यामुळे काचेच्या बॉटलमधल्या दारुची चव देखील बिघडत नाही. त्यामुळे दारुची बॉटल ही काचेची असते.