भारतात चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. ही चहा विदेशातही निर्यात केली जाते.



साधारणपणे एक किलो चहाची किंमत 400 ते 500 रुपये असते. पण हाच चहा कोट्यवधींना मिळत असेल तर... तुम्ही जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल ऐकलं आहे का?



या एक किलो चहाची किंमत कोटींमध्ये आहे. हा चहा पिणं तुम्हा-आम्हा सर्वसाधारण लोकांना मात्र परवडणारं नाही.



जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत एक मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सुमारे सात कोटी रुपयांपेक्षांही जास्त आहे.



जगातील सर्वात महागडा चहा चीनमध्ये सापडतो. ही चहाची पाती अतिशय दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केली जाते, त्यामुळे या चहाची किंमत जास्त आहे.



चीनमधील फुजियान प्रांतामधील वुई पर्वतांवर या चहाची पाने आढळतात.



जगातील सर्वात महागड्या या चहाचं नाव 'दा हाँग पाओ' आहे. या काही ग्राम चहाची किंमत सोन्याच्या किंमतीपेक्षाही जास्त आहे.



हा चहा अतिशय दुर्लभ असल्यामुळे याला चीनने राष्ट्रीय खजाना म्हणून घोषित केलं आहे.



जगातील सर्वात महागडा चहा 'दा हाँग पाओ' बाजारात मिळत नाही. हा चहा फक्त लिलावाद्वारे विकत घेता येतो. कारण हा अतिशय दुर्मिळ आहे.



चिनी लोकांचा असा विश्वास आहे की, त्यावेळी मिंग राजवटीची राणी अचानक आजारी पडली होती. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना हा चहा पिण्याचा सल्ला देण्यात आला.



हा चहा प्यायल्यानंतर राणी पूर्णपणे बरी झाली. यानंतर राजाने संपूर्ण राज्यात या चहाची लागवड करण्याचा आदेश दिला होता.