भारत आस्था आणि विविध परंपरा मानणारा देश आहे. भारतात झाडे, पर्वत, नद्या आणि अशा अनेक गोष्टींची पूजा केली जाते.



भारतात लोक त्यांच्या देवाची आणि त्याच्या वाहनाचीही पूजा करतात.



श्री गणेशाचं वाहन उंदीर आहे, म्हणून अनेक ठिकाणी उंदराचीही पूजा केली जाते. तसेच घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन असल्यामुळे त्याला देखील पवित्र स्थान आहे.



काही प्रथेनुसार, काही प्राण्यांना अशुभ मानले जाते. यातील एक प्राणी म्हणजे मांजर.



एखादी मांजर रस्त्याने आडवी गेली म्हणजे अशुभ अशी अंधश्रद्धा पाळणारे अनेक लोक आजच्या आधुनिक जगातही आहेत.



पण भारतात एका ठिकाणी या मांजरीची चक्क पूजा केली जाते. मांजरीचं मंदिरही आहे.



भारतातच एका ठिकाणी मांजरीचं मंदिर असून येथे फार पुरातन काळापासून तिची पूजा केली जाते.



कर्नाटकमध्ये हे मांजरीचं पुरातन मंदिर आहे. हे ठिकाण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात आहे. येथे बेक्कालेले नावाचे गाव आहे.



या गावातील लोक गेल्या 1000 वर्षांपासून मांजरीची पूजा करतात.



मांजर हा देवीचा अवतार आहे असे येथे राहणारे लोक मानतात, त्यामुळे त्यांची येथे मांजरीची पूर्ण विधीवत पूजा केली जाते.



या गावातील लोक सांगतात की, शेकडो वर्षांपूर्वी हे संपूर्ण गाव वाईट शक्तींनी हैराण झाले होते.



इथे दुष्ट शक्तींचा प्रकोप झाला तेव्हा मंगम्मा देवी मांजरीचे रुप घेऊन गावात आली आणि देवीने वाईट शक्तींचा नाश केला.



त्यानंतर देवी मंगम्मा या गावातून अचानक गायब झाल्यावर त्यांनी इथल्या एका ठिकाणी छाप सोडली.



त्याच ठिकाणी नंतर त्यांचे मंदिर बांधण्यात आले आणि तेव्हापासून लोक येथे मांजरींची पूजा करतात.



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.