जर तुम्ही जून-जुलैमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भारताबाहेर जाण्याची आवश्यकता नाही. भारतातच फार सुंदर अशी पर्यटनस्थळं आहेत.



भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जून-जुलै महिन्यात आल्हाददायी वातावरण असतं आणि जिथे तुम्ही सुट्ट्यांचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.



ईशान्य भारतात देखील पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहेत, त्यातीलच एक म्हणजे सेला पास. अरुणाचल प्रदेशातील तवांगपासून 78 किमी अंतरावर असलेला सेला पास अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. तवांग आणि सेला पास हा प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. तुम्हाला सुंदर तलावाजवळ ट्रेल हायकिंग आणि पिकनिकचा आनंद घेता येईल.



केदारनाथला जाणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथमधील हवामान अतिशय आल्हाददायक आहे. येथे फिरण्यासाठी सध्याचा हंगाम सर्वोत्तम मानला जातो.



स्पिती व्हॅली देखील फिरण्यासाठीच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्ही चंद्रताल, सूरज ताल, धनकर मठ, कुंझुम पास अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता.



तुम्ही संपूर्ण कुटुंबासह जून महिन्यात सोनमर्गला जाण्याचा प्लॅन करू शकता. शिकारा बोटीची सफर येथील खास आकर्षण आहे. यासोबत तुम्ही गोंडोला राइड, जेफ सफारी, फेमस ट्युलिप्स गार्डन, म्युझियम आणि इतर अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता.



हिमाचलचा कल्पा भारतातील खास पर्यटन स्थळांपैकी एक आहे. किन्नौरमध्ये वसलेले कल्पा गाव सतलज नदीच्या काठाच्या सौंदर्याचं उत्तम उदाहरण आहे.



दार्जिलिंग हा देखील पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय आहे. येथे दिवसाचे तापमान 20-21 अंश आणि रात्री 12-13 अंशांवर जाते. अनेक भागात खूप थंडी असते, यातच वेगळा आनंद असतो.



भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या...