पाश्चात्य संस्कृती आपल्याला खूप काही शिकवून गेली, त्यांचे खाद्यपदार्थ तर आपल्या सध्या खास आवडीचे झालेत..

त्यातलाचं तरुणांचा आवडीचा पदार्थ म्हणजे बर्गर.. असा हा बर्गर म्हणजे खरं तर भारतीय वडापाव सध्या खूप आगळ्या वेगळया प्रकारात मिळतोय,

चला तर पाहूया काय आहे या वेगळ्या बर्गरची वैशिष्ट्ये..

फोटो पाहून तुम्हाला कळलंच असेल ह्या स्वादिष्ट बर्गरचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे वेगवेगळे रंग आणि चव..

या बर्गरची नावंही अगदी भन्नाट आहेत, थक थक बर्गर ते शेहेनशाह बर्गर असे अनेक उत्तमोत्तम पर्याय इथे उपलब्ध आहेत

हिरव्या, लाल, गुलाबी रंगाचे हे बर्गर सध्या खवय्यांना आकर्षित करतायत..

हे बर्गर खाण्यासाठी तुम्हाला यावं लागेल खवय्यांच्या नगरीत अर्थात पुण्यात!

पुण्यातील औंध मध्ये तुम्हाला या बर्गरचा आस्वाद घेता येईल.

या बर्गरची किंमत रुपये 130 पासून सुरू होते, तसेच यामध्ये अनेक विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

नजरेची आणि जिभेची मेजवानी, रंगबेरंगी बर्गर!