टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या जेवलिन थ्रोअर नीरज चोप्रा आता फॅशन वर्ल्डमध्येही चर्चेत आहे.

नीरजनं काही दिवसांपूर्वी रॉयल लूकमध्ये काही फोटो शेअर केलेत.

नीरजनं प्रसिद्ध डिझायनर रोहित बल यांच्या ट्रेडिशनल आउटफिट्समध्ये क्लासी फोटोशूट केलंय.

चाहत्यांना गोल्डन बॉय नीरजचा हा लूक भावला असून त्याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय

नीरजनं हा बंद गळ्याचा कुर्ता जोधपुरी पँटसोबत पेअर अप केलंय.

टोकीयो ऑलिम्पिकमध्ये जेवलिन थ्रो (भालाफेक) मध्ये नीरजनं पहिलं सुवर्णपदकं कमावलं.

नीरजनं आपल्या आईवडिलांना पहिल्यांदा विमानाची सैर घडवून आणली.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

पुण्यातील आर्मी स्टेडियमचे नाव आता 'नीरज चोप्रा स्टेडियम'