सध्याच्या काळात सोशल मीडियावर प्रत्येकजण इमोजीचा वापर करतात. मेसेज लिहिण्यापेक्षा थेट इमोजीच पाठवून आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न असतो. रोजच्या वापरात वापरले जाणारे हे इमोजी यांचा शोधन नेमका कोणी लावला? याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? जपानच्या शिगेताका कुरिता यांनी इमोजीचा शोध लावला असं म्हटलं जातं. 1999 मध्ये, NTT DOCOMO या जपानी टेलिकॉम कंपनीसाठी त्यांनी 176 इमोजींचा सेट तयार केला होता. सन 1998 पासून ते 1999 च्या सुरुवातीस रंगीबेरंगी इमोजींचा वापर सुरू झाला. लोकांना त्यांचा संदेश कमी शब्दात चांगल्या प्रकारे पोहोचवता यावा यासाठी हे इमोजी तयार करण्यात आले आहे. पूर्वी ईमेल पाठवण्यासाठी अक्षरांची संख्या फक्त 250 होती. लोकांना त्यांच्या भावना इतक्या कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. ही अडचण दूर करण्यासाठी कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये स्माईली, राग, आश्चर्य आणि गोंधळ अशा भावना दर्शविणारे इमोजी तयार केले. जेरेमी बर्गे यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा 'इमोजी डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. आपल्या आयुष्यातील इमोजीचं महत्त्व पटवून देण्यासाठी इमोजी डे साजरा केला जातो.