भारतातील अनेक नद्यांच्या रंगतदार काहाण्या आहेत. भारतातील दोन अशा नद्या आहेत ज्यांमध्ये सासू सूनेचं नातं आहे असं मानलं जातं. या नद्या भारतातील काही प्रमुख नद्यांपैकी आहेत. त्यांच्या प्रवाहाच्या वेगाला पाहून त्यांना सासू आणि सूनेची उपमा दिली आहे. भगीरथी नदी ही अत्यंत वेगाने प्रवाहित होत असते. त्यामुळे या नदीला सासूची उपमा दिली जाते. तर अलकनंदा नदी ही शांतपणे प्रवाहित होत असते. त्यामुळे तिला सूनेची उपमा दिली जाते. या दोन्ही नद्यांचा संगम देवप्रयाग येथे होतो. या दोन्ही नद्यांच्या संगमाला गंगा नदी म्हटलं जातं.