भारतात सोन्याला विशेष महत्त्व आहे. अनेक शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी करणं चांगलं मानलं जातं. जर तुम्ही लग्नसराईच्या वेळी सोन्याची खरेदी करणार असाल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची फसवणूक न होण्यास मदत होऊ शकते. सोन्याची खरेदी करताना हॉलमार्कचे चिन्ह आहे ते नक्की तपासून घ्या. सोनं खरेदी करताना सोन्याचा भाव नक्की तपासून घ्या. सोनाराकडून मेकिंग चार्जविषयी नक्की जाणून घ्या. सोन्याची खरेदी केल्यानंतर रोख रकमेमध्ये पैसे देणे टाळावे. नेहमी चांगल्या सोनाराकडून नीट तपासणी करुन घ्या.