पेरू फक्त खायलाच रुचकर नाही, तर त्यात अनेक पोषकतत्त्वे असतात, ज्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे पेरूमध्ये आढळतात. त्यात व्हिटॅमिन बी 3 आणि व्हिटॅमिन बी 6 असते जे मेंदूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात
पेरूमध्ये कॉपर असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते.
पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू हे उत्तम फळ ठरू शकते. कारण त्यात भरपूर फायबर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो.
पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात. जेणेकरून आपण तरुण दिसू लागतो.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर पेरू खूप फायदेशीर ठरतो. कारण त्यात फायबर असते ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते.
पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, जरी हे जीवनसत्व जास्त नसले तरी ते तुमच्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.