भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त समोर आले आहे.



युवा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill Health update ) याने सरावाला सुरुवात केली आहे.



शुभमन गिल बुधवारी अहमदाबादमध्ये दाखल झाला.



त्यानंतर त्याने आज सरावाला सुरुवात केली आहे.



ऑस्ट्रेलियाविरोधातील (IND vs AUS) सामन्याआधी शुभमन गिल डेंग्यूने बेजार झाला होता.



त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले.



मिळालेल्या वृत्तानुसार, शुभमन गिल याची प्रकृती सुधारली आहे.



चेन्नईतून अहमदाबादला दाखल झाल्यानंतर गिल याने सरावाला सुरुवात केली आहे.



शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे.



पाकिस्तानविरोधात शुभमन गिल मैदानावत उतरणार का? याकडे सर्वच भारतीय चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.