भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना शनिवारी होणार आहे.
या सामन्यामध्ये बाबर आझम याच्या कामगिरीकडे (Babar Azam Record) सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यात बाबर आझम याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती.
जगातील अव्वल क्रमांकाच फलंदाज असलेल्या बाबरची भारताविरोधात निराशाजनक कामगिरी आहे.
भारताविरोधात त्याला आतापर्यंत एकही अर्धशतक झळकावता आले नाही.
2017 मध्ये बाबरने भारताविरोधात पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून आजतागत त्याला एकाही अर्धशतक ठोकता आले नाही.
धावांचा हा दुष्काळ विश्वचषकात दूर करणार का ? असा सवाल पाकिस्तानच्या चाहत्यांना सतावतोय.
भारताविरोधात बाबर आझमची सर्वोच्च धावसंख्या 48 इतकी आहे
श्रीलंका आणि नेदरलँड यांच्याविरोधात पाकिस्तान संघाने बाजी मारली. पण या दोन्ही सामन्यात बाबर आझमला मोठी खेळी करता आली नाही.
आता भारताविरोधात होणाऱ्या सामन्यात बाबर कशी कामगिरी करतो? याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.