दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाने अफगानिस्तानचा आठ विकेट आणि 15 षटके राखत पराभव केला.

अफगाणिस्तानविरोधात श्रेयस अय्यर याने 25 धावांची छोटेखानी खेळी केली.

या खेळीमध्ये अय्यरने एक षटकार आणि एक चौकार लगावला.

अय्यरने लगावलेल्या त्या एका षटकाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

यंदाच्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार मारण्याचा रेकॉर्ड श्रेयस अय्यरच्या नावावर झाला आहे.

अय्यरने 25 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.

अय्यरने मुजीबच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला.

या षटकाराची लांबी तब्बल 101 मीटर इतकी होती.

आताच्या विश्वचषकातील हा सर्वात लांब षटकार होय.

त्याने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.