रोहित शर्माच्या भारतीय संघानं न्यूझीलंडचा चार विकेट्सनी पराभव केला.

भारताने विश्वचषकाच्या रणांगणात जणू विजयपंचमी साजरी केली.

विश्वचषकाच्या मोहिमेत भारतीय संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला.

पण या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरलेल्या विराट कोहलीचं शतक पाच धावांनी हुकलं.

बांगलादेशपाठोपाठ याही सामन्यात विजयी षटकार ठोकण्याचा विराटचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

दरम्यान, धर्मशालातल्या या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी २७४ धावांचं आव्हान दिलं होतं.

त्या आव्हानाचा पाठलाग करताना, भारताची ३४व्या षटकांत पाच बाद १९१ अशी कठीण परिस्थिती झाली होती.

पण त्या परिस्थितीत विराट कोहली आणि रवींद्र जाडेजानं नेटानं खेळून भारताला विजयपथावर नेलं.

त्याआधी, मोहम्मद शमीनं ५४ धावांत पाच विकेट्स काढून न्यूझीलंडला २७३ धावांत रोखलं.

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशनंतर आता न्यूझीलंडचा पराभव केला.



भारताचा पुढील सामना 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरोधात होणार आहे.