भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 'सुवर्ण' कामगिरी करणारा नीरज हा दुसरा भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राच्या आधी भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला होता. ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये वर्ल्ड ॲथलेटिक्स जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा (World Athletics Championships 2023) पार पडली. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकदाही सुवर्ण पदक जिंकलेलं नव्हतं. मात्र, नीरज चोप्राने भारतासाठी 'सुवर्ण कामगिरी' केली आहे. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेकमध्ये नीरज चोप्राने भारताचं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे. याआधी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. नीरज चोप्रा देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा दुसरा खेळाडू आणि पहिला ॲथलीट आहे.