भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये स्वत:चे रेस्टॉरंट सुरु केले आहे. त्याने या त्याच्या या रेस्टॉरंटचे नाव रैना इंडियन रेस्टॉरंट असं ठेवलं आहे. त्याने त्याच्या या नव्या इनिंगविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावरुन त्याच्या रेस्टॉरंटचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच रैनाच्या या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत. सुरेश रैनाने 18 कसोटी सामने आणि 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने 78 टी - 20 सामन्यांमध्ये देखील दमदार कामगिरी केली आहे. त्याच्या आयपीएलच्या करिअरमध्ये तो गुजरात आणि चैन्नईच्या संघासाठी खेळला आहे. सुरेश रैनाने 205 आयपीएल सामन्यांमध्ये 5528 धावा केल्या आहेत.