भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे.



ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप अंतिम फेरीत मजल मारली आहे.



नीरज चोप्राने ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.



नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली आणि थेट अंतिम फेरीत मजल मारली.



हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होत असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 27 ऑगस्ट रोजी होणार आहे.



नीरजने चालू मोसमात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. यापूर्वी 88.67 मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.



पॅरिस ऑलिम्पिकसाठीही तो पात्र ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 पुढील वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.



जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये, नीरजसह, भारताचा डीपी मनू देखील भालाफेक स्पर्धेत सहभागी झाला आहे.



आतापर्यंत भारताला या स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करता आलेली नाही. त्यामुळे आता नीरज चोप्राला भारतासाठी 'सुवर्ण कामगिरी' करण्याची संधी आहे.



गेल्या वर्षी नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोडक्यातच हुकलं होतं, त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.