भारतीय महिला धावपटू द्युती चंदला मोठा झटका बसला आहे.
दुती चंद डोप चाचणीत पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
बंदीचा कालावधी 3 जानेवारी 2023 पासून ग्राह्य धरण्यात येईल.
भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात अडकली आहे.
प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दुती चंदने आशियाई स्पर्धेमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. दुतीने 2021 साली ग्रां प्रीमध्ये 100 मीटर स्पर्धा 11.17 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम रचला होता.
तीने एशियन गेम्समध्ये 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. मात्रा, आता तिच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये दुतीची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये तिचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं होतं.
आता नॅशनल अँटी-डोपिंग डिसिप्लिनरी पॅनेलने अनुच्छेद 2.1 आणि 2.2 उल्लंघन प्रकरणात दुती चंदवर चार वर्षांची बंदी घातली आहे.
डोपिंग हा शब्द क्रीडा स्पर्धांसंदर्भात वापरला जातो. डोपिंग म्हणजे स्पर्धात्मक खेळांमध्ये फसवणूक करण्याचा एक मार्ग आहे.
काही खेळाडू खेळामध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी औषधांचा वापर करतात.
ऍथलेटिक स्पर्धकांद्वारे प्रतिबंधित खेळामध्ये कामगिरी वाढवणाऱ्या औषधांचा वापर करण्यास प्रतिबंध आहे.