घरातील कामं आणि कुटुंबियांची काळजी घेणं यामध्ये महिला बहुतेक वेळा स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे वाढत्या वयात महिलांना आरोग्या संबंधित वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. महिलांमध्ये कॅल्शिअम. लोह आणि इतर पोषक तत्वांची कमतरता प्रामुख्याने दिसून येते. महिलांनी आहारावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. वयाच्या चाळीशीतही फिट आणि फाईन दिसण्यासाठी आहारात खाली दिलेल्या पदार्थांचं सेवन करा. हाडांचे आरोग्य, रक्तदाब, हदयाचे आरोग्य सुरळीत चालण्यासाठी शरीरात कॅल्शिअमची आवश्यकता असते. यामुळे महिलांनी दररोज आहारात दूध, दही, पनीर, अंडी फळं हे कॅल्शिअमयुक्त पदार्थ खाणं गरजेचं आहे. महिलांमध्ये लोहाची कमतरता ही खूप सामान्य समस्या आहे. महिलांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाले तर, याचा परिणाम मासिक पाळीवरही होतो, त्यामुळे आहारात लोहाचा समावेश करा. लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आहारात भाज्या, डाळींब आणि सुका मेवा यांच्या समावेश करा. महिलांसाठी व्हिटामिन-डी हा महत्त्वाचा घटक आहे. हे व्हिटामिन आणि हार्मोन दोन्ही असून याचा परिणाम पचनसंस्था मजबूत करण्यासाठी होतो. व्हिटामिन-डीचा आहारात समावेश करण्यासाठी संत्रे, दूध यांसारख्या पदार्थ रोजच्या आहारात सामील करा. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.