दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पाणी पिणे फायदेशीर ठरते. अशा परिस्थितीत लोक लिंबू पाण्याचा वापर करतात. लिंबू शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे की कोणत्याही गोष्टीचा अतिवापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. लिंबू पाणी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र दिवसभरात जास्त प्रमाणात लिंबूपाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे तुमची पचनक्रियाही बिघडू शकते. त्यामुळे लिंबू पाण्याचा वापर प्रमाणात करा. याच्या मदतीने तुम्ही शरीराच्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता. जास्त प्रमाणात लिंबू पाणी शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जास्त लिंबू पाण्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. लिंबू पाणी जास्त प्यायल्याने पेप्टिक अल्सरचा धोका वाढतो. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.