महिला संघ महिला टी-20 विश्वचषक 2023 खेळण्यासाठी सज्ज स्पर्धेपूर्वी विविध संघातील कर्णधार आणि खेळाडूंनी केलं खास फोटोशूट भारताची महिला स्टार सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्सची अनोखी स्टाईल नुकतीच अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकली. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं विजेतेपद पटकावलं. ज्यानंतर आता भारतीय सीनियर महिला संघाचे खेळाडू महिला टी-20 विश्वचषक 2023 खेळण्यासाठी मैदानात उतरत आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरणार स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू सज्ज झाले आहेत. स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना 12 फेब्रुवारीला होणार या विश्वचषकात 10 संघ सहभागी होत असून, त्यांना दोन गटात ठेवण्यात आले आहे.