ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान तीव्र वेदना होतात त्यांनी रोज खजूर खावे.
खजूर खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रात्रभर त्यांना पाण्यात भिजवून ठेवणे. भिजवलेले खजूर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सहज खाऊ शकता.
खजुरमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि सोडियम मुबलक प्रमाणात आढळतात.
खजूर खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे काम करते.
खजूर खाल्ल्याने डोळे आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
यामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट मधुमेह, अल्झायमर आणि अनेक प्रकारच्या कर्करोगापासून आराम देतात.
खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये व्हिटॅमिन के असते जे रक्त घट्ट होण्यापासून प्रतिबंध करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.