फळांचे अनेक शारीरिक फायदेही आपल्याला माहित आहे. पण याच फळांपैकी एक फळ म्हणजे आलूबुखारा. आलू बुखारा या फळात मात्र अनेक व्हिटॅमिन्सचा समावेश असतो. आलू बुखारा तुम्हाला अनेक प्रकारच्या हृदयरोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. आलू बुखाराचा सर्वात महत्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे आलू बुखाराच्या सेवनाने तुमचे वजन नियंत्रित राखण्यास मदत होते. या फळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. या फळामध्ये सुपरऑक्साइड देखील असते जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. आलू बुखाराचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. अशा वेळी आलू बुखारा हा तुमच्या शरीरासाठी उत्तम मानला जातो. आलू बुखाराच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.