जेव्हा लहान मुलांसाठी योग्य आणि पौष्टिक आहार निवडण्याचा प्रश्न येतो तेव्हा पालक नेहमी चिंतेत असतात लहान मुले अन्न प्रयोगांना विरोध करतात आणि अनेक भाज्या त्यांना आवडत नाहीत. ज्यामुळे पालकांना त्यांच्या जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या सेवनाबद्दल चिंता वाटते. तज्ञांनी असे सुचवले आहे की रोल्स, पास्ता, स्नॅक्स, पराठे हे लहान मुलाला महत्त्वाचे पोषक आहार देण्याचे काही उत्तम मार्ग आहेत. त्यांना हायड्रेट पदार्थ खायला देणे देखील महत्त्वाचे आहे. कारण ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. गरम जिऱ्याचे पाणी, सूप, फळांचे रस ही काही आवश्यक पेये लहान मुलांच्या आहारात समाविष्ट करायला हवेत. गाजर ही आश्चर्यकारक व्हिटॅमिन ए समृद्ध भाजी सर्वांसाठी एक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे. दही शेक, पुडिंग, रायता, ताक हे पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करू शकता ,जे आतड्याचे आरोग्य सुधारतात. त्याचबरोबर पालेभाज्यांचा समावेश करा जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.