भारतीय संघाची स्टार हॉकीपटू राणी रामपाल हीचा अनोखा सन्मान



तिचं नाव रायबरेली येथील हॉकी स्टेडियमला देण्यात आलं आहे.



मॉडर्न कोच फॅक्टरी रायबरेलीने हॉकी स्टेडियमचे नाव बदलून ‘राणी’ज गर्ल्स हॉकी टर्फ’ असे ठेवले आहे.



विशेष म्हणजे हॉकी खेळातील ती पहिली महिला खेळाडू आहे जिचं नाव एका स्टेडियमला देण्यात आलं आहे.



राणीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.



या फोटोंमध्ये ती खेळाडूंशी संवाद साधताना आणि इतर स्टाफ सदस्यांसह स्टेडियमचे उद्घाटन करताना दिसत आहे.



राणीने या फोटोंच्य कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द खूप कमी वाटतात.''



हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचंही ती म्हणाली.



FIH महिला हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये बेल्जियमविरुद्ध शेवटचा सामना खेळल्यानंतर राणी संघात परतली होती.



28 वर्षीय राणी टोकियो ऑलिम्पिकपासून दुखापतीचा सामना करत होती.