भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि एका तरुणीमध्ये वाद झाल्याचं दिसलं.



पृथ्वी शॉसोबत वाद घालणारी ही तरुणी अभिनेत्री सपना गिल आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पृथ्वी आणि तरुणीमध्ये वाद सुरु असल्याचं स्पष्ट दिसत होतं.



भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ टीम इंडियाच्या खेळातून सध्या बाहेर आहे. सध्या पृथ्वी अभिनेत्री सपना गिलसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. मुंबईच्या रस्त्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली.



सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे. त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली आहे.



सपना गिल कोण आहे तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.



सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती सध्या 26 वर्षांची आहे.



सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे.



सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. ती भोजपुरी चित्रपटांमध्ये झळकली आहे.



सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे.



चित्रपटांमुळे सपनाला अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.



सपना गिलचे इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.



भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यात सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. मुंबईतील हॉटेल बाहेर ही घटना घडली.



पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे.



सपना आणि तिच्या मित्रांनी पृथ्वीच्या मित्राच्या कारच्या काचा फोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणात ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली आहे.



सध्या अभिनेत्री सपना गिलसह इतर दोन आरोपी अटकेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासामध्ये खरं काय ते समोर येईल.