जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा नवा विक्रम रोनाल्डोने पूर्ण केले 500 लीग गोल अनेक विक्रम करणाऱ्या रोनाल्डोने कारकिर्दीत आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात रोनाल्डोने आपल्या लीग कारकिर्दीतील 500 गोल पूर्ण केले. तो सध्या सौदी अरेबियाच्या फुटबॉल लीगमध्ये खेळत आहे. तेथील अल नसर फुटबॉल क्लबमधून खेळताना रोनाल्डोने नुकत्याच एका सामन्यात 4 गोल मारले. गुरुवारी रात्री अल नासरचा सामना अल वाहदाविरुद्ध झाला. या सामन्यात रोनाल्डोने 21व्या मिनिटाला डाव्या पायाने अप्रतिम अशी किक मारून गोल केला. हा त्याचा लीग कारकिर्दीतील 500 वा गोल ठरला. रोनाल्डो इथेच थांबला नाही. त्याने बॅक टू बॅक आणखी तीन गोल केले. रोनाल्डोच्या कारकिर्दीतील ही 61वी हॅट्ट्रिक होती.