महान फुटबॉलर मेस्सीनं दिले निवृत्तीचे संकेत. एका मुलाखतीतील त्याच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आपण करिअरमध्ये सर्व काही मिळवले आहे. आता काहीच मिळवण्यासारखं नाही'', असं मेस्सीनं म्हटलं आहे. मागील कित्येक वर्ष तो वाट पाहत असलेली फिफा विश्वचषकाची ट्रॉफी त्याने नुकतीच मिळवली. ज्यामुळे तो आता निवृत्ती घेऊ शकतो. लिओनेल मेस्सी हा सात वेळा बॅलोन डी'ओर पुरस्कार विजेता आहे. हा फुटबॉलमधील सर्वात महान पुरस्कार आहे. याशिवाय त्याच्याकडे चॅम्पियन्स लीगपासून ला लीगा ट्रॉफीपर्यंत अनेक विजेतेपदं आहेत. 2021 मध्ये, त्याने आपल्या देशाला प्रथमच कोपा अमेरिका जिंकवून दिला. त्याच्या नावावर केवळ विश्वचषक ट्रॉफी नव्हती, ती इच्छाही त्यानं गेल्याच वर्षी पूर्ण केली. फिफा विश्वचषक 2022 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणूनही मेस्सीला निवडण्यात आलं होतं.