जर तुम्हाला देवाचे प्रेम पहायचे असेल तर सूर्योदय पाहावा. जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीला स्पर्श करता तेव्हा दिवसाची उत्तम सुरुवात होते. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, सूर्योदय पाहणे शरिरासाठी चांगले आहे. सकाळी लवकर उठल्याने शरिर निरोगी रहाते. तुम्ही कधी विचार केलाय का भारतात उगवणारा सूर्य प्रथम कुठे दिसतो? बहुतांश लोकांना माहित असले की अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात पहिले सूर्याचे दर्शन होते. पण खूप कमी लोकांना या जागेची माहिती आहे. जिथे सर्व प्रथम सूर्याची किरणे पडतात. अरुणाचल प्रदेशच्या वेदांग वैली येथे सूर्य सर्वात आधी दिसतो. देश-विदेशातून लोक इथे सूर्याची किरणे पाहण्यासाठी येतात. ते येथील शिखरावर उभे राहून सूर्योदयाचा आनंद घेतात.