हिवाळ्यामध्ये त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

थंडीत हवेमुळे केस कोरडे होतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणे या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते.



केमिकल बेस्ड प्रोडक्टचा वापर केल्याने केस डॅमेज होऊ शकतात.

जर तुम्हाला थंडीमध्ये सिल्की केस हवे असतील तर हा हेअर मास्क नक्की वापरा



ग्रीक योगर्ट आणि मधाचा हेअर मास्क लावल्याने केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात.

थंडीमध्ये केससारखे धुवू नका. सारखे केस धुतल्याने केसांमधील नॅचरल ऑइल निघून जाते.

थंडीत केसांमध्ये कोंडा होतो. तसेच केस कोरडे होतात. त्यामुळे थंडीमध्ये केसांना नारळाचे तेल लावावे.



नारळाचे तेल केसांना लावण्याआधी गरम करून घ्यावे.



गरम नारळाच्या तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण चांगले होते. तसेच केस स्मूथ आणि सिल्की होतात.