नियती जोशीचा 11 डिसेंबर रोजी लग्न सोहळा पार पडला. सोशल मीडियावर दिलीप जोशी यांनी नियतीच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. दिलीप यांनी मुलीच्या लग्नातील फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'नियतीला आणि आमच्या कुटुंबातील नवा सदस्य यशोवर्धनला पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.' पुढे त्यांनी लिहिले, 'आमच्यासोबत राहुन आमच्या मुलांना आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय स्वामीनारायण ' दिलीप हे कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात. दिलीप यांच्या मुलीच्या लग्नातील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. नियतीच्या लग्नाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लग्न सोहळ्यासाठी नियतीने लाल रंगाची साडी आणि सोनेरी रंगाचे दागिने असा लूक केला होता. दिलीप जोशी यांनी शेअर केलेल्या कुटुंबासोबतच्या या फोटोला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.