बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सर्व पोस्ट हटवल्या आहेत. त्याने त्याच्या अकाऊंटवरून त्याचे सर्व फोटो, व्हिडीओदेखील काढून टाकले आहेत. जॉन नुकताच 'सत्यमेव जयते 2' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जॉनचे सध्या 9.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पण पोस्ट हटवण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जॉन अब्राहम त्याच्या उल्लेखनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. जॉनचा वाढदिवस तीन दिवसांवर आला असताना त्याने असे कृत्य का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.