कपड्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जितके कमी असेल तितके कपडे लवकर वाळतात, त्यामुळे कपडे नीट पिळून घ्या.
घरामध्ये कपडे सुकविण्यासाठी, आकाराने मोठी आणि हवेशीर खोली निवडा.
कपडे लवकर सुकवायचे असतील तर ते पसरवा आणि दोरीवर अंतर ठेवून वाळवा.
दर २-३ तासांनी कपड्यांची बाजून खाली वर फिरवत राहा, जेणेकरुन कपड्यांच्या सर्व भागांना हवा लागेल.
रात्रभर पंखा चालू असलेल्या खोलीमध्ये रात्री कपडे वाळवा.
कधीही कपडे हँगरमध्ये वाळवा, कारण त्यामुळे कपडे सर्व बाजूंनी सुकतात.
कपडे कधीच एकमेकांवर घडी घालून वाळत घालू नका, त्यामुळे ते नीट सुकत नाहीत.
तुम्हाला काही कपडे तात्काळ सुकवायचे असतील तर 'या' उपकरणांचा वापर करा.
तुम्ही कपडे ड्रायरच्या मदतीने सुकवू शकता.
कपडे वाळवण्यासाठी इलेक्ट्रिक इस्त्रीचा वापर करा, पण कपडे जळणार नाही याची काळजी घ्या.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.