हिंदू धर्म हा अनेक प्राचीन मान्यतांसार आधारित आहे.

या मान्यता वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत.

यातील एक म्हणजे संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये.

जाणून घ्या काय आहे या मागचे कारण.

वास्तुशास्त्र आणि पौराणिक मान्यतेनुसार झाडू आपल्या घरातील,

केरकचरा, घाणच दूर करत नाही तर आपल्या जीवनात येणाऱ्या दारीत्र्यतेला देखील बाहेर काढत असतो.

असे म्हटले जाते की, झाडू मध्ये धनाची देवी लक्ष्मिमातेचा वास असतो.

वास्तुशास्त्रानुसार दिवसा पहाटे ते संध्याकाळपर्यंत घर स्वच्छ करण्यासाठी योग्य काळ मानला जातो.

सूर्यास्तानंतर झाडू मारणे टाळावे.

असे मानले जाते की सूर्यास्तानंतर रात्री झुडूप केल्याने घरात दारिद्र्य येते.