यावेळी होळीच्या दिवशी खास योग बनवला जात आहे. हा बुध-गुरुदित्य योग मानला जातो.

हा योग अनेक वर्षांनी तयार होतो. ज्योतिषाचार्य पंडित अमर यांच्या मते होळीच्या सणाला पांढरे कपडे परिधान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

पांढरे कपडे हे शांततेचे प्रतीक आहेत आणि पांढऱ्या रंगात प्रत्येक रंग खुलून दिसतो. त्यामुळे होळीच्या सणाला पांढरे कपडे खास परिधान केले जातात.

मनातील शांती आणि सुख-समृद्धीचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या कपड्यांमधून लोक शांतीचा संदेश देतात, असे त्यांनी सांगितले.

तसेच, मनातील सगळी जळमटं दूर करून खुल्या मनाने लोकांचा स्विकार करणे हा गुण देखील पांढऱ्या रंगात आहे.

होळीच्या निमित्ताने शत्रूही मिठी मारतात आणि त्यांचे दुःख दूर करतात, असा समज आहे.

ज्याप्रमाणे पाण्याला रंग नसतो आणि पाण्यात मिसळलेला रंग स्वतःचा बनतो. तसेच पांढऱ्या कपड्याला स्वतःचा रंग नसतो.

पांढऱ्या कपड्यावर कोणताही रंग परिधान केला तरी तो त्या रंगाचा बनतो.