मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. ‘दगडी चाळ’, ‘निळकंठ मास्तर', ‘क्षणभर विश्रांती’, ‘पोस्टर बॉइज’, ‘विजेता’ अशा अनेक मराठी चित्रपटात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, अभिनेता विद्युत जामवालसोबत तिने ‘जंगली’ या बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात तिने शंकरा ही भूमिका साकारली होती. मराठी कलाविश्वाप्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही सक्रीय असते. अनेकदा ती तिच्या फोटोशूटचे किंवा चित्रपटांचे फोटो, पोस्टर शेअर करत असते. (photo : iampoojasawant/IG) (photo : iampoojasawant/IG)