जगभरात कोरोना महामारीने दहशत निर्माण केल्यानंतर लसीचे महत्व अधिक ठळकपणे दिसू लागले. पण हा लसीकरण दिवस खरंतर 16 मार्च 1995 पासून सुरु झाला. राष्ट्रीय लसीकरण दिवस दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो. लस धोकादायक किंवा प्राणघातक असू शकतील अशा रोगांना प्रतिबंध करण्यात मदत करतात. देशात 16 मार्च 1995 रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा डोस सुरू करण्यात आला. गेल्या काही दशकांमध्ये टीबी, धनुर्वात इत्यादी प्राणघातक आजारांविरुद्धच्या लढ्यात लस हे एक महत्त्वाचे शस्त्र बनले आहे. लसींनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण दिनाचं महत्त्व फार आहे.