सध्या लोकांमध्ये झोपेत बोलणे किंवा बड-बड करणे ही समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे.
ही समस्या फक्त लहान मुलांमधेच नाही तर, वयस्कर आणि वृद्धांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
झोपेत बोलणे, हे सामान्य नजून आजाराशी संबंधित आहे. ही गंभीर आजाराची लक्षणे असून शकतात, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नका.
स्लीप टॉकिंग हा एक प्रकारचा स्वप्न विकार म्हणजेच ड्रीम डिसऑर्डर आहे. यालाच पॅरासोम्निया म्हणतात.
यामध्ये लोकांना झोपेत बोलण्याची सवय असते. ते असं काहीतरी बोलतात, जे इतरांना समजत नाही.
थकवा आणि झोप यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता, तेव्हा तुम्हाला गाढ झोप लागते.
थकवा असूनही झोप न येण्याच्या समस्येने काही लोकांना त्रास होतो. यामुळेच असे लोक रात्री झोपताना अनेकदा बोलताना आढळतात.
नैराश्य असल्याच व्यक्तीला शांत झोप लागत नाही. झोपेत असतानाही अशा व्यक्ती अनेक वेळा नैराश्याच्या कारणांचा किंवा त्याच्याशी संबंधित स्वप्नांचा विचार करत राहतात.
अनेक वेळा नैराश्यामुळे त्याला कशाची तरी भीती वाटू लागते, ज्यामुळे ते झोपेत बोलू लागतात.
त्यामुळे तुम्हालाही झोपेत बोलायची सवय असेल तर, याकडे दुर्लक्ष करु नका. हे नैराश्य सारख्या मानसिक आजारांचं पहिलं लक्षण असू शकतं.